ती बेपत्ता मुलगी अखेर सापडली

६ जानेवारी रोजी आपण आत्महत्या करण्यासाठी जात आहोत, माझ्या आत्महत्येला निशिकांत मोरे हेच जबाबदार आहेत, असे पत्र घरात लिहून ठेवून ती गायब झाली होती.

ती बेपत्ता मुलगी अखेर सापडली
SHARES

वाढदिवसाच्या पार्टीत अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे यांनी विनयभंग केलेली बेपत्ता तरुणी अखेर डेहराडून येथे सापडली. घडलेल्या प्रकारानंतर तरुणीने मोरे यांच्या नावाने पत्र लिहून ती बेपत्ता झाली होती. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

नवी मुंबईचे अप्पर पोलिस आयुक्त निशिकांत मोरे यांनी पीडित मुलीचा वाढ दिवसाच्या पार्टित विनयभंग केला. हा घडलेला प्रकार पीडित मुलीच्या पालकांनी नवी मुंबई पोलिसांच्या कानावर घातला, मात्र मोरे अति उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी दखल घेतली नाही. पत्रकारांनी हे प्रकऱण उचलून धरल्यानंतर तळोजा पोलिसांनी या प्रकरणी २६ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल केला. मात्र पोलिस कारवाई करण्यात चालढकल करत असल्यामुळे तिने ६ जानेवारी रोजी आपण आत्महत्या करण्यासाठी जात आहोत, माझ्या आत्महत्येला निशिकांत मोरे हेच जबाबदार आहेत, असे पत्र घरात लिहून ठेवून ती गायब झाली होती. आठ दिवसांनंतर ही मुलगी डेहराडून येथे सापडली असून तिला नवी मुंबईत आणण्यात आले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा