कोरोना नियमांचं उल्लंघन, एनएमएमसीने १५ दिवसात केला २२ लाखांचा दंड वसूल

नवी मुंबई महापलिकेच्या दक्षता पथकांनी 29 एप्रिल 2020 पासून कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या 70583 व्यक्ती, आस्थापना यांच्याकडून 3 कोटी 56 लाख 59 हजार 150 रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.

कोरोना नियमांचं उल्लंघन, एनएमएमसीने १५ दिवसात केला २२ लाखांचा दंड वसूल
SHARES

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दुकाने व आस्थापना सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, या कालावधीनंतरही दुकाने व आस्थापना सुरू ठेवून आदेशाचे उल्लंघन करणा-यांविरोधात महानगरपालिकेच्या दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

सेक्टर 30 ए, वाशी येथील हाऊस ऑफ लॉर्ड्स पबवर 24 जुलै रोजी रात्री 11 वाजता कारवाई करण्यात आली असून  50 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 10 जुलैपासून मागील पंधरवड्यात 31 विशेष दक्षता पथकांनी तसेच 8 विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथकांनी 2442 व्यक्ती, दुकानदार यांच्यावर मास्क, सुरक्षित अंतर न पाळणे,  थुंकणे तसंच 4 वाजल्यानंतर  दुकाने, आस्थापना सुरू ठेवणे या प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून  22 लाख 88 हजार 300 रुपये दंड वसूल केला आहे.

नवी मुंबई महापलिकेच्या दक्षता पथकांनी 29 एप्रिल 2020 पासून कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-या 70583 व्यक्ती, आस्थापना यांच्याकडून 3 कोटी 56 लाख 59 हजार 150  रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. यामध्ये मास्कच्या कारवाईपोटी 29943 व्यक्तींकडून 1 कोटी 50 लाख 18 हजार, सुरक्षित अंतर व वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 2804 आस्थापनांकडून 1 कोटी 16 लाख 44 हजार 900 आणि सुरक्षित अंतर नियमाचे उल्लंघन केल्यामुळे 36776 व्यक्तींकडून 78 लाख 56 हजार 650 आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यामुळे 1160 व्यक्तींकडून 11 लाख 39 हजार 600 रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.  

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जारी करण्यात आलेल्या 'लेव्हल ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ सेफ महाराष्ट्र'  प्रतिबंधात्मक आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने, आस्थापना 4 वाजल्यानंतर सुरु असल्यास पहिल्या वेळेस 10 हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल. तसेच रेस्टॉरंट, बार, पब 4 वाजल्यानंतर सुरु असल्यास 50 हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नियमांचे दुस-या वेळेस उल्लंघन झाल्यास सदर आस्थापना 7 दिवसांकरिता बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा