क्लिन चिट नंतरही साध्वी जेलमध्येच


क्लिन चिट नंतरही साध्वी जेलमध्येच
SHARES

मुंबई - मालेगाव ब्लास्ट प्रकरणी जेलमध्ये असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला तपास यंत्रणांनी क्लिन चिट देऊनही साध्वी जेलमध्येच आहे. यावर हायकोर्टानं देखील आश्चर्य व्यक्त केलंय. तपास यंत्रणांनी क्लिन चिट देऊनही आरोपी जेलमध्ये कसा असा सवालही कोर्टानं विचारलाय. तपास यंत्रणांनी क्लिन चिट देिल्यानंतर साध्वीनं डिस्चार्ज याचिका का नाही केली असा प्रश्न बचाव पक्षाला विचारला असता विशेष न्यायालयानं जामीन नाकारल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलं. 16 नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

मालेगाव ब्लास्ट प्रकरणी साध्वी कटाचा भाग असल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. मात्र साध्वी विरोधात कुठलाही खटला उभा राहत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. आणि एनआयएनं तिला क्लिन चिट दिली. विशेष कोर्टानं मात्र एनआयएचे दावे फेटाळून साध्वीला जामीन नाकारला होता. विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात साध्वीने सध्या उच्च न्यायालयात धाव घेतलीय.
सप्टेंबर 2008 साली मालेगावात ब्लास्ट झाले असून, त्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. ज्या स्कूटरमध्ये स्फोटके लावण्यात आली होती, ती साध्वी प्रज्ञाची असल्याचं समोर आल्यानंतर 2009 साली साध्वीला अटक करण्यात आली होती. तेव्हा पासून आतापर्यंत साध्वी जेल मध्येच आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा