नोटबंदीचा असाही फायदा

 Santacruz
नोटबंदीचा असाही फायदा
नोटबंदीचा असाही फायदा
नोटबंदीचा असाही फायदा
See all

सांताक्रुझ - 1000-500 रुपयांच्या नोटबंदीचा फटका सगळ्यांनाच बसतोय. मात्र  सांताक्रुझ परिसरात यामुळे एक चोर पकडला गेलाय. चोरी केलेल्या वस्तू हा चोर विकू शकला नाही आणि त्याला पोलिसांनी अटक केली. पाच दिवसांपूर्वी निसार शौकत अली शेख यानं सांताक्रुझ परिसरात घरफोडी केली होती. तसेच एका ऑफिसमध्ये लाखोंचा मालमत्ता घेऊनही पोबारा केला होता. मात्र हजार-पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या आणि तो चोरी केलेली मालमत्ता विकू शकला नाही, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. निसार शौकत अली शेख सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर तब्बल 45 गुन्हे नोंद आहेत. मंगळवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

Loading Comments