पालघरमध्ये चार दिवसांत सात मुलांचं अपहरण


पालघरमध्ये चार दिवसांत सात मुलांचं अपहरण
SHARES

पालघर जिल्ह्यात सध्या अल्पवयीन मूलं आणि मुलींच्या अपहरणाच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.  जिल्ह्यात 22 ते 25 एप्रिल या चार दिवसांत 6 मुली आणि एका मुलाचे अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे यात 10 ते 17 वर्षांखालील मुलांचा समावेश असल्याची अधिक माहिती मिळत आहे. नालासोपारा पूर्व येथे 17 वर्षीय एका अल्पवयीन मुलीचं अपहरण 22 एप्रिलला संध्याकाळी 4.30 च्या सुमारास झालं. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला आहे.

तर दुसरीकडे विरार पूर्व येथे देखील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची धक्कादायक माहिती समोर आली होती. ही घटना 25 एप्रिलला सकाळी 9 च्या सुमारास घडली. तर 24 एप्रिलला देखील विरार पश्चिमेला राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलेचे अपहरण रात्री 3.30 च्या सुमारास झाले होते. पालघर सोबत जव्हारमध्ये देखील अपहरणाच्या घटना समोर येत आहे. दिवसेंदिवस अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहे. त्यामुळे या मागील खऱ्या सूत्रधारांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा