मकरसंक्रातीनिमित्त नायलाॅनच्या मांजावर बंदी


मकरसंक्रातीनिमित्त नायलाॅनच्या मांजावर बंदी
SHARES

पतंग उडविणे हा मौजमजेचा खेळ असला तरी त्याला असलेल्या घातक चायना मेड (नायलाँन) मांजामुळे तो आपत्ती ठरत आहे. हा चायनामेड मांजा पक्षी-प्राण्यांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी या माजांची निर्य़ात करण्यावर, त्याची साठवणूक करण्यावर आणि वापरण्यावरबंदी घातली आहे.  

हेही वाचाः- सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण असतोच. थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मात्र ही मकरसंक्रांत आता पतंगाच्या चायनामेड मांजामुळे वन्यप्राणी पक्षी यांच्या जीवावर बेतते आहे. मकर संक्रांत म्हटले की नजरेसमोर तिळगूळ समारंभ येतोच, पण जास्त करून पतंग उडवण्याचा कार्यक्रम जास्त लक्षात येतो. त्या दिवशी सर्वसामान्यांप्रमाणे सणांचा आनंद लुटतात. मात्र कोणत्याही सणाचा अतिरेक झाला की त्याबाबत विचार करण्याची वेळ येते. त्याप्रमाणे आता पतंग उडविण्याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या सणात मोठय़ा आवाजाचे ध्वनी आणि वायुप्रदूषण करणारे आणि नागरिकांना त्रासदायक ठरणारे फटाके वाजू लागल्याने अशा फटाक्यांवर बंदी आणण्यात आली. होळी सणात रंगांची उधळण करताना साध्या रंगांऐवजी रासायनिक रंगांचा वापर होऊ लागला. रंगपंचमीच्या आनंदाऐवजी रासायनिक रंगाऐवजी दु:खद प्रसंग घडून आनंदावर विरजण पडू लागले. त्यामुळे होळीनिमित्तच्या रंगपंचमीलाही रंगवापरावर निर्बंध लादण्यात आले. थोडक्यात मिळालेल्या स्वातंत्र्याचा अतिरेक झाला की त्यावर निर्बंध आणावे लागतात. तसे निर्बंध पतंग उडवण्यावर आणण्यात आले आहे.  

हेही वाचाः- देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, राणेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत कपात

सध्या प्लास्टिक बंदीचे वारे वाहत असतानाच मकरसंक्रांतीनिमित्त नायलाँनच्या मांजाने पतंग उडवल्या जात आहेत. आपली पतंग दुसऱ्याने कापू नये यासाठी या मांजाचा वापर केला जात आहे. मात्र त्यामुळे पक्षी जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेकदा या मांजामुळे काही व्यक्तीही जखमी झाल्याच्या घटना घडल्यामुळे मुंबई पोलिसांनी बाजारात या मांजाची विक्री करणाऱ्यांवर बंदी घालण्याच आदेश दिला आहे. या माजांची विक्री करणारे, साठवनूक करणारे आणि वापरणाऱ्यांवर या पुढे मुंबई पोलिस कारवाई करणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा