ओला कारचालक हत्या प्रकरण: शिवी दिल्याने मारहाण

भरधाव वेगात वेडीवाकडी बाईक चालवून ओला चालकाला ओव्हरटेक केल्यामुळे ओला कारचालक सलिम गुलाम शेखने या तिघांना शिवी दिली. त्यावरून झालेल्या वादातून आरोपींनी सोमवारी संध्याकाळी सलिमची हत्या केल्याची माहिती तिसरा फरार आरोपी वाहिद अलीच्या चौकशीतून पुढे आली आहे.

ओला कारचालक हत्या प्रकरण: शिवी दिल्याने मारहाण
SHARES

भरधाव वेगात वेडीवाकडी बाईक चालवून ओला चालकाला ओव्हरटेक केल्यामुळे ओला कारचालक सलिम गुलाम शेखने या तिघांना शिवी दिली. त्यावरून झालेल्या वादातून आरोपींनी सोमवारी संध्याकाळी सलिमची हत्या केल्याची माहिती तिसरा फरार आरोपी वाहिद अलीच्या चौकशीतून पुढे आली आहे. पोलिसांनी नुकतीच त्याला अटक केली.


नेमकं प्रकरण काय?

गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातून ओला कारचालक सलिम शेख कार चालवत असताना बाईकवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या आरोपींनी सलिम शेख यांच्या कारला ओव्हरटेक केलं. अपघाता होताना थोडक्यात बचावल्याने सलिम शेखने त्यांना शिवी दिली.


'अशी' केली मारहाण

त्यामुळे रागावलेल्या आरोपींनी सलिम शेख यांची कार पुढे अडवून त्यांना खाली उतरवून मारहाण करण्यास सुरूवात केली. यामध्ये आरोपी इमरान उर्फ इमो शेख, अब्दुल वहाब उर्फ भोंदू अब्दुल रहिम इद्रीसी, वाहिद अली शेख यांचा समावेश होता. हे सर्व आरोपी गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात राहणारे आहेत.


फरार शेख ताब्यात

या मारहाणीत सलिमचा मृत्यू झाल्याने सर्व आरोपी फरार झाले. त्यानंतर हत्येच्या गुन्ह्याची नोंद झाल्यावर पोलिसांनी इमरान उर्फ इमो शेख, अब्दुल वहाब उर्फ भोंदू अब्दुल रहिम इद्रीसी या दोन्ही आरोपींना काही तासांत अटक केली. मात्र पोलिस मागावर असल्याचं कळाल्यानंतर वाहिद शेख फरार झाला होता. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या मोबाइलचे सीडीआर तपासून त्याला भिवंडी परिसरातून अटक केली. भिंवडीत वाहिद त्याच्या नातेवाईकांच्या घरी लपला होता.



हेही वाचा-

ओव्हरटेक केल्याच्या वादातून ओला चालकाची हत्या


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा