Advertisement

स्मगलर आजोबा


स्मगलर आजोबा
SHARES

मुंबई - दुबईवरुन येणाऱ्या एका 83 वर्षीय आजोबांना 20 लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांसह मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली आहे.  एअरपोर्ट इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली आहे. हरजिंदर सिंग छाब्रा असं या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी हरजिंदर दुबईवरून आले असता थेट इमिग्रेशन काउंटर वरील स्वच्छता गृहात गेले. एआययूला संशय आल्याने त्यांनी हरजिंदरचा पाठलाग केला तेव्हा त्यांना टिशू बॉक्समध्ये लपवलेली सोन्याची बिस्किटं मिळाली. सध्या एआययूने सोन्यासह हरजिंदरला ताब्यात घेतलं आहे. 

 

संबंधित विषय
Advertisement