महिला नोकरानेच केली मालकिणीच्या घरात चोरी


महिला नोकरानेच केली मालकिणीच्या घरात चोरी
SHARES

महिला नोकर आणि तिच्या बहिणीनेच घरात चोरी केल्याचा आरोप बोरिवली (प.) लिंक रोड येथील होरायजन इमारतीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने केला आहे. यासंदर्भात या वृद्ध महिलेने त्या दोंघींविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. सध्या बोरीवली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा धुत (62) या बोरिवलीतल्या प्रथमेश इमारतीतल्या फ्लॅट सी -1 मध्ये आपल्या कुटुंबियांसह रहातात. त्यांनी दीपा या महिलेला घरकामासाठी ठेवले होते. तिथे अधूनमधून दीपाची बहीण देखील येत असे. संपूर्ण कुटुंबिय शनिवारी जेव्हा बाहेरून घरी परतले तेव्हा घरातील साडेआठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर सामानाची चोरी झाल्याचं त्यांना समजलं. त्यानंतर कुटुंबियांनी यासंदर्भात बोरिवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर बोरिवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी दीपा आणि तिच्या बहिणीविरोधात कलम 381 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा