ओमकार बिल्डर्सच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरला ईडीकडून अटक


ओमकार बिल्डर्सच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरला ईडीकडून अटक
SHARES

मुंबईतल्या ओमकार बिल्डर्सच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरला ईडीनं अटक केली आहे. कमलकिशोर गुप्ता आणि बाबूलाल वर्मा अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. कमलकिशोर गुप्ता हा ओमकार ग्रूपचा चेअरमन आहे. तर बाबूलाल वर्मा मॅनेजिंग डायरेक्टर असल्याचं सांगण्यात येतं आहे. गेल्या तीन दिवसांपासून ओमकार ग्रूपशी संबधित अनेक ठिकाणांवर ईडीचं छापासत्र सुरू होतं. त्यानंतर ईडीनं या दोघांना अटक केली आहे. ओमकार ग्रूपचे मुंबईत अनेक ठिकाणी बांधकाम प्रकल्प आहेत.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने सोमवारी मुंबईस्थित रिअल्टी ग्रुप ओमकार रीअॅल्टर्सच्या १० कार्यालयांवर छापे टाकले. येस बँक फसवणूक प्रकरणात ही चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीने ओंकार रीएल्टर्सच्या ७ निवासी व ३ कार्यालयांवर छापे टाकले आहेत. या प्रकरणात, कंपनीला पाठविलेल्या ईमेलवर कोणतेही उत्तर आले नाही. कमल किशोर गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा हे ओंकार समूहाचे प्रवर्तक आहेत.

या ग्रुपने एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) योजनेंतर्गत मिळालेल्या मंजुरीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. एसआरए योजनेंतर्गत येस बँकेकडून४५० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन याचा गैरवापर केल्याचा आरोपही कंपनीवर आहे. या प्रकरणात येस बँकेचे सह-प्रवर्तक राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवन आणि धीरज वाधवन यांना ईडीने गेल्या वर्षी अटक केली होती. हे लोक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध पीएमएलए (मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक) कायद्यान्वये तक्रार दाखल केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा