धक्कादायक! पालघर हत्याकांडातील एका आरोपीला झाला कोरोना

पालघर जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक! पालघर हत्याकांडातील एका आरोपीला झाला कोरोना
SHARES

पालघर जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  28 एप्रिलला त्याच्या स्वॅबचे नमुने  पाठवण्यात आले होते तो रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र या आरोपीचा शनिवारी सकाळी मिळालेला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आरोपीला पालघर येथे उपचारासाठी दाखल केलं आहे. पालघर हत्याकांडातील अटकेत असणाऱ्या 20 आरोपींना वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. यामध्ये कोरोना झालेल्या आरोपीचाही समावेश आहे. चार दिवसांपूर्वीच त्या कोरोनाबाधित आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले होते. रुग्णाच्या सोबतचे आरोपी आणि इतर अशा 44 जणांना कोरोन्टाईन करण्यात आले आहे. तर वाडा, गडचिंचले, डहाणू या भागातील संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे.  

१६ एप्रिल रोजी पालघर जिल्ह्यात जमावाने तिघांची हत्या केली होती. यात दोन साधू आणि गाडीचा ड्रायव्हरचा समावेश आहे. ही घटना पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले इथं घडली होती. दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं.


हेही वाचा -

मातोश्रीवरील 3 पोलिस शिपायांना कोरोना

अखेर तळीरामांची चिंता मिटली, 'या' भागातील वाईन शाँप सुरू होणार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा