फिजियोथेरेपीस्ट हत्येप्रकरणी एकाला अटक


फिजियोथेरेपीस्ट हत्येप्रकरणी एकाला अटक
SHARES

विलेपार्ले - विलेपार्ले परिसरात झालेल्या महिला फिजियोथेरेपीस्टच्या हत्येप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी देबोशीश धारा नावाच्या संशयिताला अटक केली आहे. या हत्येत देबोशीशची नेमकी भूमिका काय होती याचा मात्र पोलिसांनी अद्याप उलगडा केलेला नाही. पश्चिम बंगालमधून त्याला अटक करण्यात आली असून मंगळवारी त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

देबोशीश हा 24 वर्षीय फिजियोथेरेपीस्टच्या घराजवळील एका सोन्याच्या दागिन्यांच्या दुकानात काम करत होता. त्यानंतर तो अचानक 10 जानेवारीला आपल्या मूळ गावी पश्चिम बंगालला निघून गेला. त्यानंतर पोलिसांचा त्याच्यावरील संशय वाढला. तत्काळ विलेपार्ले पोलिसांची एक टीम पश्चिम बंगालला रवाना झाली आणि देबोशीशला अटक करून मुंबईला आणण्यात आलं.

5 डिसेंबरच्या रात्री विलेपार्लेच्या श्रद्धानंद परिसरात २४ वर्षीय महिला फिजियोथेरेपीस्टची जीन्सने गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार देखील करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी सगळ्या बाजूने तपास केला पण, आरोपी काही त्यांना सापडत नव्हता, या महिला डॉक्टरच्या घराजवळ त्याच दरम्यान फिरणाऱ्या एका संशयिताचं सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना मिळालं होतं. पण, हा संशयित व्यक्ती कोण याचा छडा अद्याप लागलेला नाही.

पोलिसांवर ओढवू शकते नामुष्की

देबोशीशला पोलिसांनी महिला फिजियोथेरेपीस्टच्या हत्येप्रकरणी अटक केली असली तरी तो संशयित असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच्याविरोधात अद्याप तरी पोलिसांकडे पुरावा नाही. पोलीस देबोशीशची डीएनए टेस्ट करणार आहेत. मात्र त्याचा डीएनए आरोपीच्या डीएनएशी मॅच न झाल्यास देबोशीशला सोडण्याची नामुष्की पोलिसांवर ओढवू शकते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा