घातक शस्त्रासह एकाला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळून अटक


घातक शस्त्रासह एकाला मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळून अटक
SHARES

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री राहत असलेल्या वांद्रे परिसरात  कार्बाईसह फिरणा-या एका संशयीताला अटक करण्यात गुन्हे शाखा 8 च्या पोलिसांना यश आले आहे. आरोपी मध्यप्रदेशातील रहिवासी असून त्याच्याकडून कार्बाईन, मॅगझीन, पिस्तुल व जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

प्रल्हाद ऊर्फ प्रवीण वेचन बोर्डे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. आरोपी तेथे शेती करतो असे त्याने चौकशीत सांगितले आहे. याप्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 325 सह हत्यारबंदी कायदा 37(1)(अ)सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 137 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नववर्षाच्या पूर्व संध्येला संशयीत व्यक्ती शस्त्रासह येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-8च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला होता. सायंकाळी सातच्यासुमारास पोलिसांनी वांद्रे येथील इंदिरा नगर झोपडपट्टी जवळील फलाट परिसरातून तेथे आलेल्या संशयीताला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवची उत्तरे दिली. त्याचा झडतीत त्याच्याकडे  एक कार्बाईन, दोन मॅगझीन, तीन पिस्तुल व 15 जीवंत काडतुसे सापडली असून पोलिसांनी ा शस्त्रसाठा जप्त केला आहे. आरोपी या शस्त्र कशासाठी घेऊन आला होता. याबाबत पोलिस तपास करत आहेत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा