मुलुंडमधून एक कोटीच्या जुन्या नोटा हस्तगत


मुलुंडमधून एक कोटीच्या जुन्या नोटा हस्तगत
SHARES

मुलुंड - चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजरांच्या नोटांसह मुलुंड पोलिसांनी शुक्रवारी पाच जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल एक कोटी रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या आहेत. मुलुंडमधील दालमिया इस्टेट इथल्या परमेश्वर सेंटर येथे काही जण अशा प्रकारे जुन्या नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून यामध्ये पाच जणांना अटक केली आहे. झडतीमध्ये त्यांच्याकडून पाचशेच्या 9 हजार 964 नोटा, तर एक हजराच्या 4 हजार 998 नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या. या नोटा या आरोपींनी कुठून आणल्या आणि कुणाला देणार होते. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली आहे.

ही एवढी मोठी रक्कम बदली करून नव्या नोटा घेण्याचा प्राथमिक अंदाज पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये हरीश देशनेहरे (30), विपुल जैन (39), मलय दोषी (27), कुंज पटेल (27), कृष्णकुमार नाडर (45) या पाच जणांना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा