काळाचौकीत झाड पडून एकाचा मृत्यू

काळाचौकीच्या अभ्युदयनगर परिसरात न्यू शिवाजी नाइट हायस्कूलच्या समोर हे मोठं झाड होतं. दुपारी ४ च्या सुमारास हे झाड कोसळलं.

काळाचौकीत झाड पडून एकाचा मृत्यू
SHARES

मुंबईत मरण किती स्वस्त झालंय याचं उदाहण पून्हा एकदा पहायला मिळालं आहे. काळाचौकीच्या अभ्युदय नगरमध्ये भलं मोठं झाड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या मृत व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. त्याचं या झाडाखाली चपलाचं दुकान होतं.

काळाचौकीच्या अभ्युदयनगर परिसरात न्यू शिवाजी नाइट हायस्कूलच्या समोर हे मोठं झाड होतं. दुपारी ४ च्या सुमारास हे झाड कोसळलं. चपलाच्या दुकानावर हे झाड कोसळल्याने दुकान मालकाचा जागीत मृत्यू झाला. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी त्याला परळच्या के.ई.एम रुग्णालयात नेलं आहे. तर घटनास्थळी स्थानिक आणि काळाचौकी पोलिसांकडून मदतकार्य सुरू आहे. या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहे.हेही वाचा-

रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करणारे अटकेत

राजकीय घडामोडींवर पहिल्यांदाच ड्रोनचा वापरसंबंधित विषय