Advertisement

राजकीय घडामोडींत पहिल्यांदाच ड्रोनचा वापर

पवार ईडी कार्यालयाला भेट देणार त्या अनुषंगाने पोलिसांनी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. परिसरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदीही पोलिसांनी लागू केली.

राजकीय घडामोडींत पहिल्यांदाच ड्रोनचा वापर
SHARES
Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार काही तासातच ईडी कार्यालयाला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. तरीही राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कार्यर्त्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे. राजकिय घडामोडींसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर मुंबई पोलिस करत आहे. या पूर्वी मराठा आंदोलन, किर्ती व्यास हत्या प्रकरण, गणपतीत मुंबई पोलिसांनी ड्रोनचा वापर केला होता.

शिखर बँक घोटाळाप्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता पोलिसांच्या गुन्ह्यावर ईडीनेही गुन्हा नोंदवत चौकशी सुरू केली. या प्रकरणात ईडीने शरद पवार यांचे नावही संशयितांमध्ये नोंदवल्यामुळे एकच भडका उडाला. त्यातच शरद पवारांनी बेलोरा येथे असलेल्या ईडी कार्यालयाला स्वेच्छेने भेट देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली. या आधीच ईडीने मेलद्वारे गरज पडेल तेव्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल असे कऴवले होते. मात्र पवार त्यांच्या निर्णयावर ठाम होते.  पवारांनी कार्यकर्त्यांना चौकशी दरम्यान ईडी कार्यालयाबाहेर न येण्याचे आवाहन करून सुद्धा कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर गर्दी केली.

पवार ईडी कार्यालयाला भेट देणार त्या अनुषंगाने पोलिसांनी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.  परिसरात कलम १४४  अंतर्गत जमावबंदीही पोलिसांनी लागू केली. त्यामुळे परिसरात कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठीे पोलिसांकडून पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करून नजर ठेवली जात आहे. या पूर्वी मुंबई पोलिसांनी मराठा मूक मोर्चा आंदोलन, किर्ती व्यास हत्या प्रकरण, गणेशोत्सवात ड्रोनद्वारे गर्दीच्या ठिकाणी नजर ठेवली होती. मात्र राजकिय घडामोडींसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे.  दरम्यान मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी पवारांच्या घरी जाऊन त्यांनी ईडी कार्यालयाला भेट न देण्यासंदर्भात मनधरणी केली. बर्वे यांच्या विनंतीनंतर पवारांनी ईडी कार्यालयाची भेट तहकूब केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. 


हेही वाचा -

शरद पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणारच, परिसरात जमावबंदी लागू

जितेंद्र आव्हाड धडकणार ईडी कार्यालयावर, परिसरात जमावबंदी लागू
संबंधित विषय
Advertisement