रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करणारे अटकेत

मुंबईत ८५ ते ९० टक्के टॅक्सीचालक मीटरमध्ये गुप्त बटण बसवून प्रवाशांची लूट करत असल्याचे मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी उघडकीस आणले होते. मात्र याच पद्धतीने रिक्षा चालक ही प्रवाशांची फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखा -९ च्या पोलिसांना मिळाली होती.

रिक्षाच्या मीटरमध्ये फेरफार करणारे अटकेत
SHARES

मुंबईत टॅक्सीनंतर रिक्षाच्या मीटरमध्ये छेडछाड करून अधिक पैसेे उकळणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इलेक्ट्राॅनिक सर्किटच्या सहाय्याने मीटरचे प्रत्यक्ष रिडिंगमधील अंतर वाढवून हे रिक्षा चालक पैसे उकळायचे. आतापर्यंत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ रिक्षाचालकांना अटक केली आहे. संजय शेरेकर(२२), अमीन पठाण (२३),मोहम्मद बिलाल मनसूर (४५), प्रदीप शिर्के अशी या आऱोपींची नावे आहेत.


मुंबईत ८५ ते ९० टक्के टॅक्सीचालक मीटरमध्ये गुप्त बटण बसवून प्रवाशांची लूट करत असल्याचे मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी उघडकीस आणले होते. मात्र याच पद्धतीने रिक्षा चालक ही प्रवाशांची फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखा -९ च्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वांद्रे येथे सापळा रचला होता. त्यावेळी एमएच-४७-एजे-१२८५ आणि एमएच-४७-बी-६७१९ या दोन रिक्षाचालकांच्या मीटरमध्ये तफावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.


त्यानुसार पोलिसांनी या तिन्ही आऱोपींना चौकशीसाठी ताब्यात घेत, त्याच्या रिक्षाच्या मीटरची परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली. त्यावेळी रिक्षाच्या मीटरमध्ये इलेक्ट्राॅनिक मीटरमध्ये छेडछाड करून रिडींग वाढवण्यात आले होते. या मीटरचे सर्कीट त्याने त्याच्या सीटच्या खाली लावले होते. त्यानुसार तिघांवर भा.द.वि कलम ४२०,४६५,४६८,३४ नुसार गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.




हेही वाचा  -

वाशीत तरूणावर ५ जणांचा सामूहिक बलात्कार

फुकट्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेची १०० कोटींची वसुली




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा