मेट्रोच्या १०० टनाच्या गर्डरखाली चिरडून एक ठार

दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो मार्ग दोन अ चे काम सुरू आहे. या कामासाठी ट्रेलरवरून १०० टन वजनाचा गर्डर नेला जात होता.

SHARE

ट्रेलरवरून नेण्यात येणारा १०० टन वजनाचा गर्डर अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. अरमान अहमद (२५) असं मृताचं नाव आहे. कांदिवलीतील समता नगर पोलीस ठाण्याजवळ ही दुर्घटना घडली. अरमान हा मे. जे. कुमार या कंपनीसाठी काम करत होता. 

दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो मार्ग दोन अ चे काम सुरू आहे. या कामासाठी ट्रेलरवरून १०० टन वजनाचा गर्डर  नेला जात होता. पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवली येथे पहाटे ट्रेलरची जोडणी पीन पुलरमधून तुटली. त्यामुळे गर्डर मागील वाहनावर कोसळला. त्यात वाहनचालक अरमान अहमद याचा मृत्यू झाला. ट्रेलरवर तो सुरक्षितपणे ठेवण्यात आला नव्हता. त्यामुळं तो ट्रेलरवरून मागील वाहनावर पडला, अशी माहिती समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू कसबे यांनी दिली. 

गर्डर पडला तेव्हा इतर दोघांनी  वाहनातून उड्या मारल्यामुळे ते बचावले. या प्रकरणी ट्रेलरच्या चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेही वाचा -

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

ACP च्या कार्यालयात पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या
संबंधित विषय
ताज्या बातम्या