पाकिस्तान गुप्तेहर संघटनेला भारतीय बनावटीच्या विमानांची माहिती पुरवणाऱ्यास अटक


पाकिस्तान गुप्तेहर संघटनेला भारतीय बनावटीच्या विमानांची माहिती पुरवणाऱ्यास अटक
SHARES

पाकिस्तान गुप्तेहर संघटनेला भारतीय बनावटीची विमान बनवणाऱ्या कंपनीतील खाजगी माहिती पुरवणाऱ्या 41 वर्षीय आरोपी दिपक क्षिरसाठ याला दहशतवादी विरोधी पथकाकडून अटक...आरोपी हा भारतीय बनावटीची विमान बनवणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा कर्मचारी असल्याची माहिती..


एटीएसचे महासंचालक देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलीय. विमान बनवणाऱ्या तांत्रिक तपशिलाची, विमान कारखान्याच्या स्ट्रक्चरची माहिती पाकिस्तानी गुप्तेहर संघटना आय एस आय ला आरोपी पुरवत असल्याचा खुलासा. अटक आरोपीकडून 5 मोबाईल, 3 सिमकर्ड्स आणि 5 मेमरी कार्ड जप्त करण्यात आलेत ज्याच्या माध्यामातून तो आय एस आय च्या संपर्कात होता..

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा