सोशल मिडियावर पाॅर्न पाहणे महागात पडू शकते

२५ हजार गुन्हे आतापर्यंत भारतात दाखल झाले असून मुंबईत ८ गुन्हे नोंदवण्यात आले आहे

सोशल मिडियावर पाॅर्न पाहणे महागात पडू शकते
SHARES

भारतात कायद्याने चाईल्ड पोर्नोग्राफीला बंदी आहे. असे असतानाही शहरातून शंभर ते दीडशे चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी मुंबई सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत ८ गुन्हे दाखल केले आहे. अशाच गुन्ह्यात काहीदिवसांपूर्वी सायबर पोलिसांनी साकीनाकातून एका भाजीवाल्याला अटक केली होती. नुकतीच अशा गुन्ह्यात आणखी एकाला अटक केली आहे. साहिब शक्ती मोदक (२२) असे या आरोपीचे नाव आहे. मोदकने त्याच्या गुगल ड्राइव्हवरून अनेक अल्पवयीन मुला-मुलींचे फोटो अपलोड केल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचाः- पालिकेच्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाही हवा ५ दिवसांचा आठवडा

भारतात इंटरनेटवर पोनोग्राफीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी सोशल मिडियावर नवनवीन लिंकद्वारे अश्लील व्हिडिओ अपलोड आणि दाखवण्याचे प्रमाण सुरूच आहे.   चाइल्ड पोनोग्राफीची गंभीर गृहमंत्रालयाने घेतली आहे. तसा करारच भारत आणि अमेरिकेत झाला आहे.  अमेरिकेच्या 'नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अ‍ॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन'(एनमॅक) ही संस्था चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कार्यरत आहे. सोशल मिडियावर किंवा संकेतस्थळांवरील चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत ही संस्था माहिती गोळा करून गृहखात्याला पुरवते. भारतातून अशा ध्वनिचित्रफिती किंवा मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तींची तांत्रिक माहिती नुकतीच या संस्थेने गृहखात्याला पुरवली होती. त्यानुसार या संस्थेने चाइल्ड पोर्नोग्राफी पसरविणारे आयपी अ‍ॅड्रेस आणि अन्य तांत्रिक माहिती वर कारवाई करण्यास सुरूवात केली. 

हेही वाचाः-कोरोनाचा संसर्ग झालेल्या चालकांना उबर देणार भरपाई, पण...

या मोहिमेंतर्गत नॅशनल क्राइम रिपोर्टनुसार २५ हजार गुन्हे आतापर्यंत भारतात दाखल झाले असून मुंबईत ८ गुन्हे नोंदवण्यात आले आहे. साहिबने ही काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीची पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट केली होती. त्यानुसार त्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वीच सायबर पोलिसांनी साकीनाका येथे राहणाऱ्या हरिप्रसाद पटेल विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. पटेल याने गेल्या वर्षी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर लहान मुलांचा एक अश्लील व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याचे अकाऊंट बंद केले. तरीही हरिप्रसाद याने मित्राच्या मोबाइलवरून नवीन अकाऊंट तयार केले आणि पुन्हा लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड केले. याप्रकरणी माहिती मिळताच सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुक्रवारी त्याला अटक केली. सध्या पटेल या पोलिसांच्या कोठडीत आहे. 

हेही वाचाः-कच्चं तेल स्वस्त, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा