कच्चं तेल स्वस्त, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण

गेल्या २ महिन्यात मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ५.६१ आणि डिझेल ६.५७ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

कच्चं तेल स्वस्त, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण
SHARES

सौदी अरब आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अलीकडेच कोरोना विषाणूमुळे जगभरात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाली. याचाच फायदा भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरही दिसून येतोय. गेल्या २ महिन्यांत पेट्रोल प्रति लीटर ५.९० रुपयांनी स्वस्त झाले आहे. डिझेलमध्येही प्रति लिटर ६.६२ रुपयांची घट झाली आहे.


किंमतीत इतकी घसरण

११ जानेवारूपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण दिसूनयेत आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ५.६१ आणि डिझेल ६.५७ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

११ जानेवारीला दिल्लीत पेट्रोलची किंमत ७६.०१ रुपये होती. तर आता म्हणजेच ११ मार्चला दिल्लीत पेट्रोलची किंमत ७०.२९ रुपये प्रतिलिटर आहे. त्याचप्रमाणे ११ जानेवारीला दिल्लीमध्ये डिझेलची किंमत ७०.२९ रुपये होती, जी आता खाली आली आहे. आता डिझेल ६३.०१ रुपयांवर आलं आहे. म्हणजेच, २ महिन्यांत दिल्लीत पेट्रोल ५.७२ आणि डिझेल प्रति लिटर ६.६२ रुपयांनी स्वस्त झाले आहे.


चेन्नईमध्ये पेट्रोल ५.९० रुपयांनी तर डिझेल ६.६२ रुपये प्रति लिटर स्वस्त झाले आहे. ११ जानेवारीला चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत ७८.९८ आणि प्रति लिटर ७३.१० रुपये होती. यावेळी कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत ५.६१ रुपये आणि ६.२० रुपये प्रति लीटर स्वस्त झाली आहे


कच्चा मालाच्या किंमतीत घसरण का?

तेल उत्पादन कमी करण्यासंदर्भात ओपेक आणि रशियामध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे नव्या दर युद्धाची सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये तब्बल ३० टक्के घसरण झाली आहे. सौदी अरेबिया रशियाची कोंडी करण्यासाठी तेलाचे उत्पादन वाढवून किंमती कमी करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये तेलाचे दर आणखी पडतील. याचा फायदा भारतासह अन्य देशांना होईल


२० वर्षांची सर्वात मोठी कपात

१९९१ नंतर पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये इतकी मोठी घसरण झाली होती. ब्लूमबर्गच्या मते, ओपेक आणि त्याच्या सहयोगी देशांमध्ये तेलाचं उत्पादन थांबवण्यासंदर्भात कोणताही करार झाली नाही. त्यामुळे सौदी अरेबियानं गेल्या २० वर्षांत तेलाच्या किंमतीत सर्वात मोठी कपात करण्याची घोषणा रविवारी केली. यामुळे एप्रिलमध्ये डिलीव्हरीचे दर आशियासाठी प्रति बॅरल ४-६ डॉलर आणि अमेरिकेसाठी ७ अब्ज डॉलर्स कमी झालेहेही वाचा

कोरोना व्हायरसचा 'कोरोना बिअर' व्यवसायावर परिणाम

लवकरच येणार वॉर्निश केलेल्या १०० रुपयांच्या नोटा

संबंधित विषय