संजय गांधी उद्यानाच्या संकेतस्थळावरील माहितीहून पर्यटकांची फसवणूक

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (एसजीएनपी) संकेतस्थळावर चुकीचा मोबाइल नंबर टाकून पर्यटकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे.

SHARE

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (एसजीएनपी) संकेतस्थळावर चुकीचा मोबाइल नंबर टाकून पर्यटकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी एसजीएनपीद्वारे पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

एसजीएनपीच्या www.sgnp.maharashtra.gov.in या संकेतस्थळवर दिवसाला हजारो नागरिक भेट देतात. उद्यानातील महत्त्वाची स्थळे तसंच मनोरंजनाच्या ठिसंदर्भातीलकाणाचे शुल्क यासंदर्भातील माहिती या संकेतस्थळावर पहायला मिळते. काही दिवसांपूर्वी शैलेंद्र मिश्रा यांनी देखील याप्रमाणे शोध घेतला. पण त्यांची दिशाभूल झाली. ते एका लिंकवर गेले तिथे त्यांना 9330272267  हा मोबाईल नंबर दिसला. या मोबाइलवर शैलेंद्र यांनी संपर्क केला असता त्यांना आरोपींनी आॅनलाइन तिकिट घेण्यासाठी एक लिंक पाठवली. या लिंकवर क्लिक केल्यानंतर शैलेंद्र यांना त्यांच्या खात्यातून १५ हजार ३०० रुपये ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आला. 

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, शैलेंद्र यांनी पुन्हा त्या क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फोन नंबर बंद येत होता. या प्रकरणी शैलेंद्र यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा  -

रस्त्यात मुलींसमोर अश्लील चाळे करणाऱ्यास अटक


शिवडीत ९ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

संबंधित विषय
ताज्या बातम्या