सायबर चोरट्यांनी वकिलाला १ लाख ७८ हजार रुपयांना ठगवले

तक्रारदार यांनी तो फाँर्म खात्री न करताच भरून ते कामावर निघून गेले. काही वेळानंतर त्याच्या मोबाइलवर एका मागोमाग एक असे १४ मेसेज आले. ते मेसेज पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

सायबर चोरट्यांनी वकिलाला १ लाख ७८ हजार रुपयांना ठगवले
SHARES

मोबाइलवर आलेली लिंक खात्री न करता ओपन केल्यास तुम्हचीही फसवणूक होऊ शकते.  नुकतीच सायबर चोरट्यांनी अशा प्रकारे एका वकिलाला  १ लाख ७८ हजार रुपयांना गंडा घातल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्याची गरज

जोगेश्वरी परिसरात राहणारे ३३ वर्षीय तक्रारदार हे पेशाने वकिल आहेत. त्यांचे बँक आँफ बडोदामध्ये बचत खाते आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या मोबाइलवर एक फोन आला होता. त्यावेळी समोरील व्यक्तीने आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने बँक अँप्लिकेशन अपडेट करण्यास तक्रारदार यांना सांगितले. त्यानुसार त्याने मोबाइलवर पाठवलेल्या लिंकवर तक्रारदाराने क्लिक केले. लिंक ओपन झाल्यानंतर त्यात एक फाँर्म होता. तक्रारदार यांनी तो फाँर्म खात्री न करताच भरून ते कामावर निघून गेले. काही वेळानंतर त्याच्या मोबाइलवर एका मागोमाग एक असे १४ मेसेज आले. ते मेसेज पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

हेही वाचाः- पालघर, सफाळे स्थानकात प्रवाशांचा रेल रोको

त्याच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी एका मागोमाग एक असे १ लाख ७८ हजार रुपये काढले. अवघ्या १० मिनिटात हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणी तक्रारदाराने ओशिवरा पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली आहे. या ठगाचा ओशिवरा पोलिस सायबर तज्ञांच्या मदतीने शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा