वेदनादायक ! मुंबईत आणखी एका पोलिसाचा मृत्यू

राज्यात गेल्या ४८ तासांत १५० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ५७ इतकी झाली आहे

वेदनादायक ! मुंबईत आणखी एका पोलिसाचा मृत्यू
SHARES

मुंबईतील धारावी पोलिस ठाण्याचे एका ५५ वर्षीय कोरोनाबाधित कॉन्स्टेबलचा शनिवारी अंधेरीच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे. मे महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते माहिम पोलिस वसाहतीत वास्तव्याला होते. त्यांच्या पश्च्यात  पत्नी आणि १ मुलगा,१ मुलगी असा परिवार आहे. राज्यात गेल्या ४८ तासांत १५० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ५७ इतकी झाली आहे.

हेही वाचाः- Lockdown in Maharashtra: ३० जूननंतर लाॅकडाऊन सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं

धारावी हे सध्या कोरोनाचे हाँटस्पाँट म्हणून ओळखले जाते आहे. अशात धारावी पोलिस मोठ्या जिद्दीने या संपूर्ण परिस्थितीचा सामान करत आहेत. मात्र नागरिकांच्या थेट संपर्कात आल्यामुळे आता मुंबई पोलिस दलात कोरोना बाधित पोलिसांची संख्या ही वाढत आहे. धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले ५५ वर्षीय पोलिस काँन्स्टेबल यांना देखील  मे रोजी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली. ५ मे रोजी त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न होताच, त्यांना तातडीने सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही ददिवसानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना ६ जून रोजी पुढील उपचारासाठी अंधेरीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. मात्र त्यांचे दुर्दैवी निधन झाले. ते माहिम पोलिस वसाहतीत वास्तव्याला होते.

हेही वाचाः- कोरोना चालेल, राजकारण नको!

मुंबईतील कोरोनावर उपचार घेणा-या पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहेत. याशिवाय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. पोलिस यंत्रणेकडून रेमदेसीवीर व टॉसिलिझ्युमॅब सारखी औषधीही तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आतापर्यंत मुंबईतील २५५०  पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील १७५० पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. ६९२ पोलिस सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. राज्य पोलिस दलातील ४१०० पोलिसांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुसंख्या पोलिसांनी कोरोनावर मात केली असून सध्या एक हजार पोलिस सध्या उपचार घेत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा