पालघर साधू हत्याकांडातील ४७ आरोपींना जामीन

पालघर मधील साधूंसह त्यांच्या ड्राव्हरच्या हत्येप्रकरणी जवळजवळ २०० लोकांना अटक करण्यात आले होते.

पालघर साधू हत्याकांडातील ४७ आरोपींना जामीन
SHARES

पालघर मधील मॉब लिंचिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४७ आरोपींना  अखेर सोमवारी जामीन देण्यात आला आहे. जिल्हाचे न्यायाधीश पीपी जाधव यांनी आरोपींना प्रत्येक १५ हजार रुपयांच्या जामीनावर सर्व आरोपींना सोडले आहे. गेल्याच महिन्यात कोर्टाने या प्रकरणातील ५८ आरोपींना जामीन दिला होता.

पालघर मधील साधूंसह त्यांच्या ड्राव्हरच्या हत्येप्रकरणी जवळजवळ २०० लोकांना अटक करण्यात आले होते. वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी कोर्टात अर्ज दाखल असे करत म्हटले की, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांचा काहीच सहभाग नाही आहे. त्यांच्यावर संशय असल्याने अटक करण्यात आल्याचे वकिलांनी कोर्टाला सांगितले. १६ एप्रिल २०२० रोजी पालघर येथे चिकने महाराज कल्पवृक्षगिरी आणि सुशीलगिरी महाराज यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर निलेश तेलगडे यांची पालघरमध्ये हत्या करण्यात आली. हे दोन साधु त्यांच्या ड्रायव्हरसह गुजरातकडे अत्यंसंस्कारासाठी जात होते.

हेही वाचाः- भारत बंद! मुंबईत बेस्ट, टॅक्सी सुरू राहणार

मात्र पालघर येथील जमावाने ते मुल पळवणारी टोळी असल्याचे समजत त्यांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीत दोन साधुंसह त्यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला. पालघर हत्याकांड प्रकरणी सीआयडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आले. तर या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले होते. सोशल मीडियात ही या प्रकरणाचा निषेध करण्यात येत होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा