आरे कॉलनीतून बिबट्या जेरबंद

आरे कॉलनी - गोरेगावच्या आरे कॉलनीत शुक्रवारी एका बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलंय. गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतखाली होते. पण बिबट्याला पकडल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला. अनेकदा पिंजरा, जाळं बसवूनही वनविभागाच्या हाती बिबट्या लागत नव्हता. मात्र शुक्रवारी बसवलेल्या जाळ्यात बिबट्या हाती लागला. या बिबट्याला नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आलं. असे अनेक बिबट्या बोरीवली नॅशनल पार्क आणि आरे कॉलनीत पाहायला मिळतात , असं स्थानिकांनी सांगितलंय. बिबट्या परिसरात फिरत असल्याची दृश्य अनेकदा सीसीटिव्हीत कैद झाली आहेत.

Loading Comments