घरी येण्यास नकार दिल्यानं प्रेयसीवर चाकूहल्ला

 Pali Hill
घरी येण्यास नकार दिल्यानं प्रेयसीवर चाकूहल्ला

मुंबई - भांडूप परिसरात बुधवारी सकाळी एका महिलेवर प्रियकरानं चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात कविता खाकीखिसाबोला(39) ही गंभीर जखमी असून, तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तिचा प्रियकर सुनील रिडलान (42) फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. कविता आणि सुनील या दोघांचे विवाहबाह्य संबंध होते. सुनीलला त्याची पत्नी तर कविताला तिचा पती सोडून गेला होता. तेव्हापासून हे दोघेही एकत्र राहतात. मंगळवारी या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले आणि भांडणानंतर कविता घर सोडून गेली. सकाळी सुनील तिची समजूत काढण्यासाठी घरी गेला मात्र कवितानं येण्यास नकार दिल्यानं सुनीलचा राग अनावर झाला आणि चिडलेल्या सुनीलने कविता घराबाहेर पडली हे दिसताच तिच्यावर चाकूनं हल्ला केला. याआधीही सुनीलने कवितावर तीन वेळा चाकूनं हल्ला केला होता.

Loading Comments