...आणि टेम्पो झाला गायब

 Wadala Road
...आणि टेम्पो झाला गायब

वडाळ्यातल्या एका वेअर हाऊसच्या प्रवेशद्वारासमोर उभा केलेला 10 लाख रुपये किंमतीचा टेम्पो चोरीला गेल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे.

वडाळा पूर्व येथील शिवशंकर नगरमध्ये राहणारे तुकाराम सरगत यांचा भाजीचा धंदा आहे. घराजवळ टेम्पो उभा करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री वडाळ्यातील वेअर हाऊसच्या प्रवेशद्वारासमोर आपला टेम्पो उभा केला होता. पहाटे 5 वाजताच्या सुमारास ते भाजीचा माल आणण्यासाठी आपल्या टेम्पोजवळ गेले परंतु त्यावेळी टेम्पो तेथून गायब झाला होता. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. जवळपास तीन तास शोधूनही टेम्पो सापडला नसल्याने अखेर त्यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर चोरीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक नलिनी शिंदे अधिक तपास करत आहेत.

Loading Comments