ओव्हरहेड वायरला चिकटून तरुण जखमी

 Pali Hill
ओव्हरहेड वायरला चिकटून तरुण जखमी

मुबंई - लोकल ट्रेनच्या टपावरून कुणी प्रवास करू नये, असे सतत रेल्वेकडून संगितले जाते. मात्र, तरीही काही प्रवासी टपावरून स्टंट करत आपल्या जिवाशी खेळताना दिसतात. असाच एक प्रकार अंधेरी स्थानकावरही घडलाय. लोकल ट्रेनच्या छतावरून प्रवास करताना ओव्हरहेड वायरला चिकटून एक तरुण जखमी झाला. जखमीला उपचारासाठी जवळच्याच कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण मंगळवारी सकाळी चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या लोकलच्या छतावरून प्रवास करत असताना अंधेरी स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर ही घटना घडली.

Loading Comments