अल्पयीन मुलीवर बलात्कार

 Andheri
अल्पयीन मुलीवर बलात्कार

अंधेरी - गोनीनगरमध्ये तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. तीन वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना अज्ञाताने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला पळवले. एका निर्जन स्थळी तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करून मुलीला ती राहत असलेल्या परिसरातल्या कचऱ्याच्या डब्याजवळ टाकून पळ काढला. मुलगी दिसत नसल्याने मुलीच्या आईने शोध सुरू केला. मुलीसोबत खेळत असलेल्या लहान मुलाने मुलगी एका अज्ञातासोबत गेल्याचे सांगितले. शोध घेत असताना मुलगी कचऱ्याच्या डब्याजवळ आढळली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मुलीला के.ई.एम रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. वैद्यकीय चाचणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती एमआयडीयी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ शैलेश पासलवार यांनी दिली.

Loading Comments