Corona virus: कोरोना विलगीकरण केंद्रातून पळून जाणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करणार - अनिल देशमुख

विलगीकरण कक्षातून पळून जाणाऱ्या रुग्णांवर ‘साथीचे रोग अधिनियमान्वये’ कारवाई करण्याचे निर्देश

Corona virus: कोरोना विलगीकरण केंद्रातून पळून जाणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करणार - अनिल देशमुख
SHARES

देशात कोरोनाचे थैमान हे दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता ४९ वर पोहचला आहे. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ऐकीकडे सरकारी कर्मचारी कोरोना बाधित रुग्णांच्या सुरक्षतेसाठी उपाय योजना करत असताना. दुसरीकडे कोरोना विलगीकरण केंद्रातून रुग्ण पळून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा रुग्णांवर आता ‘साथीचे रोग अधिनियमान्वये’ कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. 

कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं, दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर कार्यालयांसह मॉल्स व दुकानं बंद ठेवण्याचे आवाहन सरकार तर्फे करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग हा मिनिटागणित वाढतच असल्याचे निदर्शनास आले आहे. काल पर्यंत ४२ वर असणारा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा गुरूवारी ४९ पर्यंत पोहचल्याने सरकारी हालचालींना आता वेग आला आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात येऊन अन्य कोणाला ही या संसर्गाचा त्रास होऊ नये. या अनुशंगाने रुग्णांचे विलगीकरण केले जात असताना. विलगीकरण कक्षातून रुग्ण पळून जात असल्याचे वारंवार पुढे येत आहे. अशाने या संसर्गाला रोखण्यात अपयश येऊ शकते. 

हेही वाचाः- Coronavirus Updates: मुंबई, उल्हासनगरमध्ये आणखी 2 रुग्ण

त्यामुळे विलगीकरण कक्षातून पळ काढणाऱ्यांवर आता  ‘साथीचे रोग अधिनियमान्वये’ कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले आहे. हातावर स्टॅम्प असलेले विलगीकरण कक्षातील रुग्ण बुधवारी पालघरलोकलमधून प्रवाक करत होते. ६ जण गुजरातला जाण्यासाठी निघालेल्यांना पून्हा ताब्यात घेतले आहे. रुग्णांचे पळून जाण्याचे प्रमाण  कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळेच सरकारकडून आता त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे ठरवले असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचाः- कोरोनामुळे 10 हजार कर्मचाऱ्यांना पाठवले बिनपगारी रजेवर

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा