बंदुकीच्या रिकाम्या पुंगळ्यांनी पोहोचवले तुरूंगात

  Mumbai Airport
  बंदुकीच्या रिकाम्या पुंगळ्यांनी पोहोचवले तुरूंगात
  मुंबई  -  

  इतर देशांप्रमाणे भारतात हौसेखातर हत्यार बाळगणं तेवढं सोपं नाही. मग त्या बंदुकीच्या रिकाम्या पुंगळ्या (कार्टेज) का असेनात. विनापरवाना पुंगळ्या ठेवणे हा देखील भारतात गुन्हाच ठरतो. याचाच प्रत्यय दुबईहून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाला आला. हौसेखातर बंदुकीच्या पुंगळ्या बाळगल्या प्रकरणी रमण पवार (29) नावाच्या इसमाला चक्क तुरूंगाची हवा खावी लागली आहे.

  उत्तराखंडमध्ये राहणारा रमण पवार आफ्रिकेत फिरायला गेला होता. तेथे त्याने प्रोफेशनल फायरिंगची मजा लुटली. पण हीच मजा त्याच्यासाठी भारतात सजा ठरली. आफ्रिकेतील प्रोफेशनल फायरिंगची एक आठवण म्हणून त्याने झाडलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या म्हणजेच 'कार्टेजे'स घेऊन रमण भारतात आला. मात्र विमानतळावरील तपासणीत त्याच्या सामानात 'कार्टेजे'स मिळाल्याने एकच खळबळ उडाली. इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला थेट सहार पोलिसांच्या ताब्यात दिले.

  आपल्या देशात विना परवाना रिकाम्या पुंगळ्या देखील बाळगता येत नसल्याने आम्ही आरोपीला हत्यार कायदा 3 (25) खाली अटक केली आहे. बुधवारी त्याला कोर्टात हजार केलं असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव मुखेडकर यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.