उडत्या विमानात... बिडी जलै ले!


उडत्या विमानात... बिडी जलै ले!
SHARES

एखाद्याला लागलेली तल्लफ अनेकांचे जीव धोक्यात अाणू शकते, याचा प्रत्यय हरयाणा ते मुंबई विमानात बसलेल्या प्रवाशांना अाला अाहे. विमानात शिरण्याअाधी ज्वलनशील पदार्थ नेण्यास मनाई असते. असं असतानाही हरयाणाच्या एका महाशयानं विमानात चक्क विडी अोढण्याचा प्रयत्न केला. विडीच्या धूरानं फायर अलार्म वाजला अाणि विमानातल्या सर्वांच्याच हृदयात धडकी भरली. विमानाला अाग लागल्याचा समज सर्वांचा झाल्यानं एकच खळबळ उडाली. पण विमानातील कॅप्टननं बाथरूममध्ये डोकावून पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस अाला.


अर्ध्या तासाने विडी पिण्याची सवय

हरयाणातील ६५ वर्षीय राजकुमार गर्ग मुंबईतील अापल्या नातेवाईकाच्या निधनानंतर पुढील विधींसाठी विमानाने मुंबईला येत होते. रायपूर विमानतळावरून जेट एअरवेजच्या विमानाने ते मुंबईला येत होते. दर अर्ध्या तासाने विडी पिण्याची त्यांना सवय होती. रायपूर विमानतळावर त्यांना विडी पेटवता अाली नाही. त्यामुळे ते बेचैन झालं. विमानतळावरील सुरक्षारक्षकांची नजर चुकवून ते विडी घेऊन विमानात शिरले.


...अाणि सुरू झाली पळापळ

विमानाच्या बाथरूममध्ये विडी पेटवल्यास, कुणाला काहीच कळणार नाही, असा त्यांचा समज झाला. बाथरूममध्ये एेटीत विडी अोढत असताना विडीच्या धुराने फायर अलार्म वाजू लागला. जमिनीपासून लाखो किलोमीटर उंचीवर विमान असताना विमानाला अाग लागल्याच्या भीतीने सर्वच प्रवाशी घाबरले. विमानातील प्रवाशांसह कर्मचाऱ्यांचीही पळापळ सुरू झाली.


पायलटच्या सतर्कतेमुळे धोका टळला

पायलटने निरखून पाहिले असता, बाथरूममधून धूर येत असल्याचे लक्षात अाले. हा वास विडीचा असल्याची खात्री पटल्यानंतर विमानातील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मुंबईला पोहोचल्यानंतर राजकुमारविरोधात अधिकाऱ्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी राजकुमारला अटक केली अाहे.


हेही वाचा -

मुंबई विमानतळावर सोनं तस्करांना ओव्हर कॅान्फिडन्स नडला!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा