चेंबूरमध्ये गर्द्दुल्यांचा तरुणांवर हल्ला

 Chembur
चेंबूरमध्ये गर्द्दुल्यांचा तरुणांवर हल्ला
Chembur, Mumbai  -  

दोन दिवसांपूर्वीच गोवंडीच्या शिवाजीनगर येथे चार गर्द्दुल्ल्यांनी नशेसाठी दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री देखील चेंबूरच्या खारदेवनगर येथे पूर्व वैमनस्यातून काही गर्द्दुल्ल्यांनी चार तरुणांवर चाकू आणि तलवारीने हल्ला केला आहे. यामध्ये हेमंत जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्यावरच आरोपींनी तलवारीने वार केला आहे.

गुरुवारी रात्री हेमंत त्याच्या काही मित्रांसह घराबाहेर उभा असताना यातील एका आरोपीने पहिल्यांदा हेंमतसोबत बाचाबाची केली. याच बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपींनी चाकू आणि तलवारीच्या साहाय्याने हेमंत आणि त्याच्या मित्रांवर हल्ला चढवला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत गोवंडी पोलिसांनी सात ते आठ जणांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Loading Comments