मोबाईल नंबर मागितला म्हणून घेतला जीव

 Powai
मोबाईल नंबर मागितला म्हणून घेतला जीव

पवई - मुंबईच्या पवई परिसरात मुलीचा फोन नंबर मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सचिन हेमाडे (20) तरुणाचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून त्याचा भाऊ रूपेश हेमाडे आणि त्याचे मित्र जखमी झाले आहेत. या प्रकरणी पवई पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

सांगितलं जातंय की अादल्या दिवशी रूपेशने पवईच्या टेकडीपाडा परिसरात राहणाऱ्या एका मुलीचा मोबाईल नंबर मागिताला होता. मुलीने नंबर न देता घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. होळीनंतर रात्रीच्या सुमारास रूपेश त्याचा भाऊ सचिन आणि इतर मित्रांसह टेकडीपाडा परिसरात गेला असता मुलीचे नातेवाईक रूपेशवर धावून गेले. बांबूच्या काठ्यांनी त्याला मारण्यास सुरवात केली, आपल्या भावाच्या बचावासाठी छोटा भाऊ सचिन मध्ये पडला असता त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. बियरच्या बाटलीने सचिनवर हल्ला करण्यात आला. ज्यात त्याच्या मांडीला जबर जखम झाली. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोवर त्याचा मृत्यु झाला होता.

Loading Comments