मनसुख हिरेन हत्या प्रकरण: पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक

या प्रकरणात अटक झालेले माने हे मुंबई पोलीस दलातील तिसरे अधिकारी आहेत. याआधी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि रियाझ काझी यांना अटक केली आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरण: पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक
SHARES

मुकेश अंबानी यांचं निवासस्थान अँटिलियाबाहेर कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांच्या प्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस निरीक्षक सुनील माने यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली आहे.  

या प्रकरणात अटक झालेले माने हे मुंबई पोलीस दलातील तिसरे अधिकारी आहेत. याआधी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि रियाझ काझी यांना अटक केली आहे.  घटना घडली त्यावेळी सुनील माने हे युनिट ११ मध्ये  पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनांमध्ये त्यांचे नाव समोर आल्यानंतर  त्यांची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली.

दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील माने यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता.  सुनील माने यांना एनआयएने गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. या प्रकरणी सहभाग स्पष्ट झाल्याने माने यांना  शुक्रवारी अटक करण्यात आली. 

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची पत्नी विमल हिरेन यांनी आपल्या पतीला कांदिवली क्राईम ब्रांचमधून फोन आला होता आणि चौकशीसाठी बोलावलं होतं असं सांगितलं होतं.



हेही वाचा 

  1. विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील ICU विभागात आग, १३ जणांचा मृत्यू

  1. 'ऑक्सिजन' एक्स्प्रेस महाराष्ट्राकडे रवाना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा