कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे कामगाराचा मृत्यू


कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे कामगाराचा मृत्यू
SHARES

पालघरमधील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामागारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील मेसर्स ऑरो लेबोरेटरिज लिमिटेडमधील प्लांट के-56 कंपनीत गॅस लागल्याने एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. ही घटना शुक्रवारी 28 एप्रिलला घडली असून, उमेश शर्मा(45) या कामगाराचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

मयत कामगार उमेश शर्मा शिवाजी नगर, सालवड येथील रहिवासी असून, रात्रपाळीसाठी तो मेसर्स ऑरो लेबोरेटरीज लिमिटेड कंपनीत काम करत होता. मात्र अचानक गॅस पेटल्याने यात कामगारांला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापना विरोधात सी आर 28/217 कलामांतर्गत कंपनीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर यांच्या तपासानुसार या कंपनीला बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तरी देखील या कंपनीने मनमानी कारभार करत काम सुरू ठेवले. त्यामुळे पोलीस आता या कंपनीवर काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा