COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
40,162
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

पीएमसी बँकेकडून गुंतवणूकदारांचा शोध सुरू

एचडीआयएल या मालमत्ता विकासकाला बँकेच्या एकूण ८,८०० कोटी रुपयांच्या वितरित कर्जापैकी ७३ टक्के म्हणजे ६,५०० कोटी रुपयांची कर्जे शेकडो बेनामी खात्यांद्वारे वितरित केल्याचं उघडकीस आल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसीवर निर्बंध घातले.

पीएमसी बँकेकडून गुंतवणूकदारांचा शोध सुरू
SHARES

आर्थिक गैरव्यवहारामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी) निर्बंध घातले आहेत. निर्बंध घालून एक वर्ष झाले असून आता बँकेला नवसंजीवनी देणाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पीएमसीमध्ये गुंतवणुकीस  इच्छुक असलेल्या गुंतवणूकदारांकडून बँकेने अर्ज मागवले आहेत. तशी जाहिरात पीएमसी बँकेच्या संकेतस्थळावर मंगळवारी बँकेच्या प्रशासनाने दिली आहे. 

बँकेच्या व्यवस्थापनावर नियंत्रण मिळवू इच्छिणाऱ्या सुयोग्य भांडवली गुंतवणूकदार अथवा गुंतवणूकदारांचा गट निर्धारित करून बँकेचे पुनरुज्जीवन केले जावे आणि त्यायोगे तिच्या दैनंदिन कारभार नव्याने सुरू केला जावा, अशा उद्देशाने इरादापत्र मागविण्यात येत आहेत, अशी पीएमसी बँकेच्या प्रशासकांनी प्रसिद्धीस दिलेल्या जाहिरातील म्हटले आहे. इरादापत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२० निश्चित करण्यात आली आहे.

एचडीआयएल या मालमत्ता विकासकाला बँकेच्या एकूण ८,८०० कोटी रुपयांच्या वितरित कर्जापैकी ७३ टक्के म्हणजे ६,५०० कोटी रुपयांची कर्जे शेकडो बेनामी खात्यांद्वारे वितरित केल्याचं उघडकीस आल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसीवर निर्बंध घातले. बँकेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक, संचालक मंडळ तसेच वरिष्ठ अधिकारी याप्रकरणी गजाआड गेले आहेत.Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा