भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाला पीएमसी घोटाळ्यात अटक

. रणजित सिंग हे बँकेच्या कर्जवसुली समितीवर होते. दरम्यान, आता पीएमसी बँकेतून खातेदारांना ५० हजार रुपये काढता येणार आहेत.

भाजपच्या माजी आमदाराच्या मुलाला पीएमसी घोटाळ्यात अटक
SHARES

देशातील बहुचर्चित पीएमसी घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भाजपचे माजी आमदार सरदार तारसिंग यांचे पुञ रणजित सिंग याला शनिवारी अटक केली. रणजित हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सरदार तारासिंग यांचा मुलगा आहे.

रणजित सिंगच्या अटकेमुळे अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रणजित सिंग हे बँकेच्या कर्जवसुली समितीवर होते. दरम्यान, आता पीएमसी बँकेतून खातेदारांना ५० हजार रुपये काढता येणार आहेत. आर्थिक गैरव्यवहारांमुळे रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेतील व्यवहारांवर निर्बंध घातले. पण या निर्बंधांनंतर अनेक खातेदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यापार्श्वभूमीवर टप्याटप्याने रिझर्व्ह बँकेने बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवत नेली आहे.

तत्पूर्वी, एचडीआयएल ग्रुपचे राकेश व सारंग वाधवान, बँकेचे माजी चेअरमन वरयाम सिंग, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांचा समावेश आहे. पीएमसी बँकेतील ४ हजार ३५५ कोटींचा कर्ज घोटाळा उघड झाल्यानंतर या सर्वांना अटक करण्यात आली आहे.

देशातील पहिल्या दहा सहकारी बँकांमध्ये समावेश असणाऱ्या पंजाब आणि महाराष्ट्र बँकेत झालेल्या प्रचंड घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. बँकेच्या व्यवस्थापनाने एनपीए आणि कर्जवितरणासंबंधी चुकीची माहिती रिझर्व्ह बँकेस सादर केली होती. यानंतर घोटाळा उघडकीस आला होता. मात्र, यामुळे बँकेतील ठेवीदार मोठे अडचणीत आले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा