कुत्र्याच्या हत्येप्रकरणी प्रसिद्ध कवीच्या मुलीची पोलिसांकडे तक्रार

सोसायटीच्या वॉचमननं रस्त्यावरील कुत्र्याला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत कुत्रा जागीच ठार झाला.

कुत्र्याच्या हत्येप्रकरणी प्रसिद्ध कवीच्या मुलीची पोलिसांकडे तक्रार
SHARES

दिवसेंदिवस कुत्र्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना विलेपार्ले इथल्या शिवम सोसायटीतजवळ घडली. सोसायटीच्या वॉचमननं रस्त्यावरील कुत्र्याला अमानुष मारहाण केली. या मारहाणीत कुत्रा जागीच ठार झाला. वॉचमननं मारहाण करून ठार केल्याप्रकरणी कवी प्रदीप यांची मुलगी मितुल प्रदीप यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

... म्हणून कुत्र्याचा राग करायचा

लंगडू नावाचा एक कुत्रा विलेपार्ले इथल्या शिवम सोसायटीजवळ रहात होता. त्याचे दोन पाय जन्मापासूनच अधू होते. त्याला जन्मापासूनच पाय नसल्यानं त्याचे नाव लंगडू असं ठेवण्यात आलं होतं. लंगडू हा जन्मापासूनच अपंग असल्यानं अनेकजण त्याला खायला घेऊन येत. वॉचमनला ही बाब आवडत नसे. त्याचमुळे१३ नोव्हेंबरला लंगडूला शिवम सोसायटीच्या वॉचमननं अमानुष मारहाण केली.

सोसायटीच्या सदस्यांची साक्ष

सोसायटीमध्ये राहणाऱ्या सदस्यांनीही या प्रकरणी त्यांची साक्ष दिली आहे. लंगडूला करण्यात आलेली मारहाण एवढी क्रूर होती की त्यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर स्व. कवी प्रदीप यांच्या कन्या मितुल प्रदीप यांनी जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी अमानुष मारहाण आणि ठार मारल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.


लंगडूसाठी कँडल मार्च

लंगडूसारखे बळी जातात ही बाब दुर्दैवी आहे. मुक्या प्राण्यांबाबत अशा प्रकारची घटना घडणं चीड आणणारे आहे” असं मितुल यांनी म्हटलं आहे. तसंच २४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता शिवम सोसायटीमधून लंगडूसाठी कँडल मार्चही काढला जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं.




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा