लोकलमध्ये महिलांची छेडकाढून त्यांना धावत्या लोकलमधून ढकलणाऱ्यास अटक


लोकलमध्ये महिलांची छेडकाढून त्यांना धावत्या लोकलमधून ढकलणाऱ्यास अटक
SHARES

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये महिलांसोबत अतिप्रसंग करत त्यांना धावत्या लोकलमधून ढकलून जिवे ठार मारणाऱ्या सराईत आरोपीला रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. राजू बंड्या पांडे उर्फ मुरगडी असे या आरोपीचे नाव असून तो नवी मुंबईच्या कौपरखैराने येखील रहिवाशी आहे.

हेही वाचाः- दिलासादायक! २०२० नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

१ जानेवारीला सकाळी ११ वाजेच्या सुमारास हार्बर मार्गावरील वडाळा ते पनवेल या लोकल ट्रेनने एक महिला लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करत होती. त्या डब्यात जास्त प्रवासी नसल्याचा फायदा घेत वडाळा येथून लोकल सुटल्यावर धावत्या लोकलमध्ये आरोपी राजू बंड्या पांडे उर्फ मुरगडी हा या डब्यात घुसला. आरोपी त्या महिलेजवळ गेला आणि तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या मनास लज्जा निर्माण होईल अशा प्रकारचे हावभाव केले. त्यावेळी लोकल जीटीबी स्टेशनजवळ आल्याने वेग कमी होता. ही महिला लोकलच्या दरवाज्यातून आरडाओरडा करू लागल्याने आरोपीने तिला धावत्या लोकल मधून ढकलून दिले. लोकलचा वेग अतिशय कमी झाल्याने महिलेस जास्त दुखापत झाली नाही. पण हाताला मार लागला.

हेही वाचाः- पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ४९ नवीन कोरोना रुग्ण

याबाबत वडाळा लोहमार्ग पोलिसात तक्रार दिल्यावर वडाळा पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी समांतर तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या वतीने एक विशेष पथक तयार करण्यात आले. याप्रकरणी तपास करताना पोलिसांनी रेल्वे स्टेशनवर असलेले सीसीटीव्ही फुटेज तसंच शहर हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पण आरोपीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. विविध रेल्वे स्थानकात पोलीस आरोपीचा शोध घेत होते. तसंच आपल्या खबऱ्यांकडून माहितीही घेत होते. आरोपी हा नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील रहिवासी असून तो एका हॉटेलमध्ये काम करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. ४ जानेवारीला गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कोपरखैरणे येथील घरी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले असता सीसीटीव्हीत असलेला चेहरा मिळताजुळता आढळला. याप्रकरणी आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा