• पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक
  • पत्नीचा खून करणाऱ्या पतीला अटक
SHARE

मुलुंड - चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना गुरुवारी मुलुंडमध्ये घडली. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी शनिवारी आरोपी जयेश म्हादलेकर (36) याला अटक केली.

जयेश आणि श्रेया यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या लग्नाला 14 वर्षे होऊन गेली होती. परंतु जयेशच्या संशयी स्वभावामुळे त्यांच्यात सतत भांडणं होत असत. यालाच कंटाळून श्रेया तिच्या 12 वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. परंतु जयेशने तिच्या माहेरी जाऊन विनवण्या करून तिला मुलुंडमधील अंबिकानगर येथील राहत्या घरी घेऊन आला. परंतु त्यानंतरही त्यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात जयेशने लोखंडी सळीने श्रेयाच्या डोक्यात वार करून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला होता. मात्र मुलुंड पोलिसांनी त्याला मुलुंडमधूनच शोधून काढलं आणि ताब्यात घेतलं. या सर्व प्रकारामुळे घरगुती हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या