अमेरिकन महिलेचं फेसबुक हॅक, आरोपीला अटक

मुंबईत वास्तव्यास असलेल्या अमेरिकन महिलेचं फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यावरून अश्लील कमेंट करणाऱ्या ४५ वर्षीय आरोपीला सायबर पोलिसांनी विमातळावरून अटक केली आहे.

अमेरिकन महिलेचं फेसबुक हॅक, आरोपीला अटक
SHARES

मुंबईत वास्तव्यास असलेल्या अमेरिकन महिलेचं फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यावरून अश्लील कमेंट करणाऱ्या ४५ वर्षीय आरोपीला सायबर पोलिसांनी विमातळावरून अटक केली आहे. उमंग कत्रानी (४५) असं या आरोपीचं नाव असून २०१६ मध्ये त्यानं मुंबईतील कार्यालयात काम करणाऱ्या महिलेचं फेसबुक खातं हॅक  केलं होतं. उमंगच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी लूक आऊट सर्कुलर(एलओसी) जारी केलं होतं.

फेसबुक हॅक

मूळचा भारतीय रहिवासी असलेल्या उमंगकडं अमेरीकेचं ग्रीन कार्ड आहे. २०१६ मध्ये त्यानं मुंबईतील कार्यालयात काम करणाऱ्या महिलेचं फेसबुक खातं हॅक केलं होतं. त्यानंतर तो त्या महिलेच्या खात्यावरून अश्‍लील पोस्ट अपलोड करत होता. याबाबतची माहिती महिलेला मिळाल्यानंतर तिनं सायबर पोलिसांकडं तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिस तपासात उमंगचा सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी उमंग विरोधात १९,५०९ भा..वि आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला. त्या दिवसांपासून पोलिस उमंगच्या मागावर होते. तो अमेरिकेत वास्तव्याला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं याप्रकरणी लूक आऊट सर्कुलर(एलओसी) जारी करण्यात आलं होतं.

आरोपीला जामीन

अखेर सोमवारी कत्रानी मुंबई विमानतळावर आला असता विमानतळावरील केंद्रीय यंत्रणांनी त्याला ताब्यात घेऊन सायबर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला याप्रकरणी अटक केली. याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं जामीन दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.



हेही वाचा -

MHT-CET निकाल जाहीर, मुंबईच्या किमया शिकारखानेला ९९.९८ टक्के

रमजान ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम अधिकाऱ्यांना लवकर पगार



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा