जकात चोरी करणारे अटकेत

  Ghatkopar
  जकात चोरी करणारे अटकेत
  मुंबई  -  

  घाटकोपर - जकात चोरी रोखण्यासाठी पालिकेनेे सध्या मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री पालिकेचे भरारी पथक गस्त घालत असताना एक टेम्पो जकात न भरता पळून जात असताना या पथकाच्या निदर्शनात आला. पथकाने पाठलाग करून सुकामेवा असलेलं हे वाहन जप्त केलं. जप्त केलेलं वाहन मनपाच्या पंतनगर येथील यान गृहात ठेवण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी रात्री काही जण हा माल चोरून बाहेर काढत असल्याचे पंतनगर पोलीसांना समजताच त्यांनी याठिकाणी धाव घेत माल घेऊन पळवलेल्या टेम्पोसह प्रसाद काळे आणि नानाभाऊ मस्के या दोघा चोरट्यांना अटक केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.