हाॅटेल मालकाकडे खंडणी मागणारा अटकेत

मोहितेने हाॅटेल मालकाकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही मोहितेने तक्रारदाराला दिली होती.

हाॅटेल मालकाकडे खंडणी मागणारा अटकेत
SHARES

पवईत हाॅटेल मालकाला खंडणीसाठी धमकावून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या शंकर मोहिते (३७) यासा गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वीही हत्या, खंडणी, मारहाण या सारख्या ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


२५ हजारांची मागणी

पवई परिसरात तक्रारदाराचे हाॅटेल असून त्याच परिसरात मोहिते राहतो. मागील अनेक दिवसांपासून मोहिते तक्रारदाराला खंडणीसाठी धमकावत होता. मोहितेने त्याच्याजवळ २५ हजार रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही मोहितेने तक्रारदाराला दिली होती. मात्र, पैसे देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने पवई पोलिसात धाव घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पवई पोलिसांनी हा गुन्हा गुन्हे शाखा १० च्या पोलिसांकडे वर्ग केला.


सापळा रचला

पोलिस मोहितेच्या मागावर होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोहिते हा स्वतःची ओळख लपवून मरोळ परिसरात लपला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी २६ मे रोजी सापळा रचून मोहितेला अटक केली. पोलिस चौकशीत त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचं समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.हेही वाचा -

डाॅ. पायल आत्महत्या: तिन्ही आरोपी डाॅक्टरांचं निलंबन

अनुराग कश्यपच्या मुलीबाबत सोशल मीडियावर अश्लील कमेंट, ओशिवरा पोलिसात गुन्हा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा