बोगस जामिनदारांमार्फत आरोपींना तुरूंगाबाहेर काढणारी टोळी गजाआड

काही दिवसांपूर्वी ही टोळी मुंबई दंडाधिकारी न्यायालयात एका आरोपीला जामिनावर सुटका करून घेण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांनी बोगस कागदपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक करण्याचा प्रयत्नही केला.

बोगस जामिनदारांमार्फत आरोपींना तुरूंगाबाहेर काढणारी टोळी गजाआड
SHARES

आरोपींच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रांच्या मदतीने बोगस जामिनदार उभा करून थेट न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. वर्षभरापासून ही टोळी बनावट कागदपत्रे बनवून बोगस जामिनदार उभे करून मुंबईतील सराईत गुन्हेगारांना तुरूंगाबाहेर काढण्यासाठी मदत करायची. या टोळीकडून पोलिसांनी बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी लागणारी सामग्री हस्तगत केली आहे.


मानखुर्द, गोवंडीतील अारोपी

शाकीर हुसेन मेहंदी खान (३५), शफिक रफिक कुरेशी (३४), फय्याज अमनउल्ला खान (३४), इम्रान सुलमानी (२७), मोहम्मद परवेज अब्दुल शेख (५०), रियाज अहमद पठाण (३४), मुझफ्फर काझी (३८), युसुफ खान (३१) अशी या आरोपींची नावे आहे. हे अारोपी शिवाजीनगर, मानखुर्द, गोवंडी भागातील राहणारे  अाहेत. यातील चौघे रिक्षाचालक आहेत. तर इतर आरोपी छोटी-मोठी कामे करतात. 


न्यायालय परिसरात सापळा 

काही दिवसांपूर्वी ही टोळी मुंबई दंडाधिकारी न्यायालयात एका आरोपीला जामिनावर सुटका करून घेण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांनी बोगस कागदपत्र सादर करून न्यायालयाची फसवणूक करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेळीच ही बाब उघडकीस आली. काही दिवसातच ही टोळी पून्हा न्यायालय परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सर्वांना ताब्यात घेतले.


बोगस कागदपत्रे जप्त

आरोपींकडून पोलिसांनी ७८ बनावट शिधावाटप कार्ड, मुंबईतल्या विविध पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे ५५ शिक्के, सरकारी अधिकाऱ्यांच्या सह्यांचे बनावट स्टँम्प पेपर, पॅन कार्ड, बोगस कंपन्याच्या ५८ वेतन पावत्या, १२ बनावट मार्कशिट हस्तगत केले आहेत. 



हेही वाचा - 

म्हणून 'तो' स्वत:चाच गळा चिरून घ्यायचा...

एटीएम मशीनला स्किमर लावून चोरी करणारा अटकेत




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा