महिलेचं लैंगिक शोषण करणार आरोपी गजाआड

 Mira Bhayandar
महिलेचं लैंगिक शोषण करणार आरोपी गजाआड

मीरारोड येथे राहणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमास काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. अमित माधव हलधर (42) असं या नराधमाचं नाव असून, तो मालाड पूर्व येथील दिंडोशी परिसरात राहतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीरारोड येथे 32 वर्षीय महिला राहत होती. दोन वर्षांपूर्वी तिची ओळख अमित हलधर याच्या सोबत झाली. याच दरम्यान या दोघांमध्ये प्रेम झालं. यावेळी अमित याने तिला लग्नाचं आमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण केले. मात्र ज्यावेळी ही महिला गर्भवती राहिली तेव्हा मात्र या नराधमानं तिच्याशी बोलणं बंद केलं. अखेर पीडित महिलेने पोलिसांकडे धाव घेताच पोलिसांनी या नराधमावर 376 कलमांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Loading Comments