बारमालक मारहाण प्रकरणी चौघांना अटक

Dahisar East
बारमालक मारहाण प्रकरणी चौघांना अटक
बारमालक मारहाण प्रकरणी चौघांना अटक
See all
मुंबई  -  

बार मालकाचे अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी दहिसर पोलिसांनी चौघांना अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या चार आरोपींची नावं श्रीकांत जाधव, अभिजय शिंदे, सुशिल दळवी आणि सागर साळवी अशी आहेत. अटकेनंतर या चौघांना बोरीवली न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर या चौघांची 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सध्या पोलीस फरार असलेल्या दोन आरोपींच्या शोधात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 9 एप्रिलला दहिसरच्या संभाजीनगरमधील बार मालकाचं अपहरण करून काहींनी त्यांना इन्होवा कारमध्ये बसवून बोरीवलीच्या ऋषीवनमध्ये नेत मारहाण केली होती. त्यांनतर जखमी बारमालक रितिक पटनायक यांना कंदिवाली (प.) इथल्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रितिक पटनायक हे भायंदरमधले रहिवासी आहेत. ते दहिसरमधील संभाजीनगरमध्ये बार चालवतात. त्यांचे प्रभाकर पवार नावाच्या व्यक्तीसोबत जमिनीवरून वाद सुरू होते. त्याच वादातून पवारने बारमालक पटनायक यांना संभाजीनगरच्या लिंक रोड येथे बोलावलं आणि साथीदारांच्या मदतीने पटनायक यांचं अपहरण करत बोरीवलीच्या ऋषीवनात नेऊन त्यांना मारहाण केली आणि पळ काढला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.