भाडेतत्वावर कॅमेरा देताय? जरा सांभाळून !

 Goregaon
भाडेतत्वावर कॅमेरा देताय? जरा सांभाळून !

तुम्ही जर तुमचा महागडा कॅमेरा भाडेतत्वावर देत असाल तर, जरा जपून. कारण अशाच प्रकारे भाडेतत्वावर घेतलेला कॅमेरा विकून अनेकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गोरेगाव वनराई पोलिसांनी 26 वर्षाच्या दिलीप रॉय उर्फ जॉय समर देवनाथ या आरोपीला दिल्लीतून अटक केली आहे. याच्यावर आरोप आहे, शूटिंगचा बनाव करून सुरुवातीला तो व्हिडिओ कॅमेरा भाडेतत्वावर घेत असे. त्यानंतर गुपचुपपणे तो कॅमेरा विकत असे. अशा प्रकारे त्याने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती उघडकीस आली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्योत्स्ना रासम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे. अशा प्रकारे आरोपीने किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपासही पोलिस करत आहे.

Loading Comments