शिक्षकांच्या आंदोलनाचा बळी

 Pali Hill
शिक्षकांच्या आंदोलनाचा बळी

मुंबई- मंगळवारी औरंगाबाद येथे विनाअनुदानित शिक्षकांच्या मोर्चात झालेल्या गोंधळात वरळी बीडीडी चाळीतील मुंबई रेल्वे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल प्रकाश कांबळे (५२) यांचा ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुर्देवी मृत्यू झाला. राहुल प्रकाश कांबळे हे बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंत्रीमंडळ बैठकीच्या बंदोबस्तासाठी कांबळे यांना इतर कर्मचाऱ्यां सोबत औरंगाबाद येथे पाठवण्यात आले होते. तरी बुधवारी संध्याकाळी राहत्या घरी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंकार करण्यात येणार आहे. कांबळे यांच्या पच्छात पत्नी, दोन मुली, आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Loading Comments